Posts

Showing posts from March, 2021
 जीवनाला सामोरे भिडत असते कविता अथांग सागराचा तळ असते कविता                        माझी कविता आयुष्यातला चढ-उतार असते कविता पांथस्थांचा वाटसरू असते कविता सर्जनाचा आविष्कार असते कविता आत्म्याचा हुंकार असते कविता लडिवाळ, वेल्हाळ, तान्हुलं असते कविता विराट, लहरी, हट्टी असते कविता झाडाच्या प्रत्येक पानात असते कविता पावसाच्या प्रत्येक थेंबात असते कविता सुख- दु:खाचा हिशेब असते कविता उधाणलेल्या सागराची लाट असते कविता भावभावनांचा आविष्कार असते कविता जीवनाशी एकरूप होत असते कविता महादेव कोरे